मुंबई – आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं जोरदार टोला लगावला आहे. दाजी हे वागणं बरं नव्हं…असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे.
जालन्याच्या सभेत बोलताना दानवे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. मी पैसे दिल्यावर तुम्ही माझ्या पाठिशी उभे राहणार की नाही?, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झालेत असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं होतं. रावसाहेब दानवेंनी विरोधकांचा उल्लेख चोट्टे म्हणजेच चोर असा केला होता. त्यांची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून दानवे यांना राष्ट्रवादीनं टोला लगावला आहे.
दाजी हे वागणं बरं नव्हं…
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य!सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या
आणि शेतकऱ्यांची ‘साले’ म्हणून अवहेलना करणाऱ्या रावसाहेब दानवेंचे हे वक्तव्य ऐका..@raosahebdanve @BJP4Maharashtra @BJP4India #BJPkeJumlebaj pic.twitter.com/hCQrTvOaTR— NCP (@NCPspeaks) March 2, 2019
COMMENTS