पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका राष्ट्रवादीच्या आमदाराचं ठरलं, भाजपात प्रवेश करणार?

पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका राष्ट्रवादीच्या आमदाराचं ठरलं, भाजपात प्रवेश करणार?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा मोठा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसत आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. अजूनही काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. कोल्हापूरमधील चंदगडच्या राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर या भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. येत्या 10 ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन त्या भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहे.

दरम्यान आमदार कुपेकर यांनी भाजपात प्रवेश केला तर त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. डॉ. बाभूळकर यांचं सासर नागपूर आहे. तसेच बाभूळकर कुटुंबाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध चांगले आहेत. अशातच पंधरा दिवसापूर्वी डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे कुपेकर या लवकरच भाजपात जातील असं बोललं जात आहे.
कुपेकर यांनी भाजपात प्रवेश केला तर याठिकाणी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS