विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार?, राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये रस्सीखेच?

विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार?, राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये रस्सीखेच?

मुंबई – विधानसभा निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56 जागा, राष्ट्रवादीला 54 जागा तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. या निकालावरुन सत्ता शिवसेना -भाजपकडे गेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीही तिसय्रा स्थानावर आहे. भाजप -शिवसेना सत्तेवर विराजमान झाल्यास राष्ट्रवादीकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा रंगली आहे.

दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांचं नावंही चर्चेत आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सांभाळल्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS