धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली, राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर !

धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली, राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर !

बीड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढली आहे. पाणीप्रश्नावरुन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. परळी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे. ही सत्ता धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील आहे. मात्र, या नगर पालिकेत पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने नगरपालिकेविरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक देशमुख आणि संजय फड यांनी पुन्हा तिकीट दिलं नाही तरी हरकत नाही. परंतु पाण्यातील पाप सहन करणार नाही असा पवित्रा घेतला आहे. तसेच या दोन्ही नगरसेवकांनी नगरपालिकेविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं ते उपोषण करत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढली असून या पाणीप्रश्नावर ते कसा तोडगा काढणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS