चंद्रपूर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. मात्र, निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पहिला जाते. पक्षाच्या ताकद राज्यभरात वाढविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरुवात केली. ते चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरी येथे बोलत असताना त्यांनी अनेक जण का पक्ष सोडून दिले. याचे स्पष्टीकरण केले.
जयंत पाटील म्हणाले, निवडणुकीत आघाडी असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाने एकही जागा लढवली नाही. त्यामुळे अनेक जण पक्ष सोडून गेले. मात्र आजही पक्षाचा सच्चा कार्यकर्ता पक्षासाठी काम करतोय. मी त्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून कौतुक करतो, असे उद्गार काढले.
लोकांच्या मनात पक्षाविषयी आस्था निर्माण करणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम आहे. पक्षाने मोठ्या अपेक्षा ठेऊन आपल्याला पद दिलेलं असतं. त्याप्रमाणे आपण कामगिरी करायला हवी. पक्षाच्या विश्वासावर खरं ठरणं ही आपली जबाबदारी आहे. पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांना योग्य दिशा द्या, बुथ कमिटी मजबूत करा व जनसंपर्क वाढवा. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष करा, संघर्षाशिवाय गत्यंतर नाही! या संघर्षातून तुम्ही मार्ग काढला तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असा संदेश पाटील यांनी युवा कार्यकर्त्यांना दिला.
COMMENTS