पिंपरी-चिंचवडमध्ये बंडखोरीनंतर राष्ट्रवादीनं अखेर बदलला उमेदवार !

पिंपरी-चिंचवडमध्ये बंडखोरीनंतर राष्ट्रवादीनं अखेर बदलला उमेदवार !

पिंपरी चिंचवड – बंडखोरी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी मतदारसंघात अखेर उमेदवार बदलला आहे. राष्ट्रवादीनं माजी आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांना उमेदवारी दिली होती. परंतु माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी नाराजी व्यक्त करून बंडखोरी करीत अपक्ष लढण्याचा इशारा दिला होता. अखेर पक्षाने निर्णय बदलत शिलवंत-धर यांच्याऐवजी बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव असून या मतदारसंघात महायुतीतर्फे शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली आहे. तर आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांना उमेदवारी दिली होती. परंतु राष्ट्रवादीतील इच्छुक असलेले माजी आमदार बनसोडे व शेखर ओव्हाळ यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच बंडखोरी करून अपक्ष लढण्याचा इशारा दिला. त्यानंतर पक्षानं उमेदवार बदली करुन बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे.

COMMENTS