अहो, चिऊताई, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?, राष्ट्रवादीचा बॅनरवरुन हल्ला !

अहो, चिऊताई, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?, राष्ट्रवादीचा बॅनरवरुन हल्ला !

मुंबई – अहो, चिऊताई, महाभारत, रामायण यांचे कथानक राहू द्या… देश की जनता यह जानना चाहती हैं, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?” असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसने भाजप खासदार पूनम महाजन यांच्यावर बॅनरवरुन हल्ला केला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांना पूनम महाजन यांनी ‘शकुनीमामा’ असं म्हटलं होतं.  त्यांच्या या वक्तव्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर लावून, “देश की जनता जानना चाहती है, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?” अशी विचारणा केली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नवा वाद सुरु झाला असल्याचं दिसत आहे.

पुनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली आहे. प्रवीण महाजनने प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या? याचे अंतर्गत जे काही कांगोरे आहेत, ते काही जणांना माहित आहेत. त्यापैकी मी एक आहे. आमच्या बापाला बोलाल, तर खबरदार. मर्यादा सोडायला दोन मिनिटंही लागणार नाहीत. पण दोघांचेही (शरद पवार आणि प्रमोद महाजन) संबंध होते, त्याची तरी आपल्याला आठवण यायला हवी होती, असही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

COMMENTS