अहमदनगर – भाजपला पाठिंबा देणाय्रा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर कारवाई होणार का?,  शरद पवार यांची प्रतिक्रिया!

अहमदनगर – भाजपला पाठिंबा देणाय्रा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर कारवाई होणार का?, शरद पवार यांची प्रतिक्रिया!

अहमदनगर – महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. याबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला कोणत्याही परिस्थिती पाठिंबा द्यायचा नाही, हे मी आधीच स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही भाजपाला पाठिंबा देण्यात आला. प्रदेशाध्यक्षांचा आदेश नाकारणाऱ्यांना नोटीस पाठवली असून येत्या ५ दिवसांत संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान निवडणुकीनंतर इथले आमदार मला भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी मला संपूर्ण परिस्थिती सांगितली होती. तसेच शिवसेनेबाबतही मला त्यांनी सांगितले. मी त्यांना त्याचवेळी आपण वेगळा विचार करू. पण कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर जायचे नाही, हे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतरही भाजपाला पाठिंबा दिल्याचे मला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे पक्षादेश न ऐकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं यावेळी पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS