पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा तिढा सुटला, ‘यांची’ नियुक्ती !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा तिढा सुटला, ‘यांची’ नियुक्ती !

पुणे – पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला आहे. महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत तुपे यांच्या नावाची घोषणा केली आहे. या निवडीमुळे शहराध्यक्षपदाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून महापालिकेचं विरोधीपक्षनेतेपदही तुपे यांच्याकडेच राहणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान विद्यमान शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांची दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवड केल्यानंतर शहराध्यक्ष बदलाची चर्चा पक्षात सुरु होती. त्यासाठी पक्षातील 13 आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी नगरसेवक दीपक मानकर, सुभाष जगताप, प्रशांत जगताप यांची नावे चर्चेत होती. मात्र, मानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांचे नाव मागे पडले. तर, सुभाष जगताप यांना मोहोळमधून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा असल्याने या पदासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकला नाही.

 

 

COMMENTS