उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार अखेर ठरला!

उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार अखेर ठरला!

मुंबई – सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून माजी खासदार उदयनराजे भोसले हे मैैदानात आहेत. परंतु राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. परंतु चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे लोकसभेसाठी राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार याबाबतच चर्चा होती. परंतु आज अखेर राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीनिवास पाटील हे 3 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार भरणार आहेत. श्रीनिवास पाटील हे 1999 ते 2009 असे दोन टर्म कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आहेत. 1999 साली कराड लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर 2009 साली त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय झाले होते. तसेच त्यांनी सिक्कीमचे राज्यपाल
म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे. जिल्ह्यातील ते ज्येष्ठ नेते असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS