पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा !

पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा !

नवी दिल्ली – पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेल्या ज्येष्ठ नेत्यानं अचानक राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. लक्ष्मीकांत खाबिया हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष आणि पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय होते. खाबिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान खाबिया यांच्या अचानक राजीनाम्याचं कारण मात्र अजून गुलदस्त्यात आहे. एऩएसयूआयच्या अध्यक्षपदापासून राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात  केली होती. खाबिया १९९९ साली राष्ट्रवादीत दाखल झाले होते.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद, प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेपदपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिला असल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

COMMENTS