त्यामुळे शरद पवारांनी केला आयुष्यातील सर्वात प्रिय गोष्टीचा त्याग !

त्यामुळे शरद पवारांनी केला आयुष्यातील सर्वात प्रिय गोष्टीचा त्याग !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयुष्यातील सर्वात प्रिय गोष्ट सोडल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ती गोष्ट म्हणजे नॉनव्हेज होय. शरद पवार यांना नॉनव्हेज जेवण फारच आवडतं. परंतु त्यांनी त्याचा त्याग केला आहे. वजन कमी करण्यासाठी त्यांनी नॉनव्हेज सोडलं असून यामध्ये ते यशस्वीही झाले आहेत. त्यांनी शारीरिक वजन तब्बल १४ किलो कमी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी कुठल्याही डाएट एक्सपर्टची मदतही घेतली नाही. त्यांनी स्वतःच डाएट ठरवत ६ महिन्यांत वजन कमी केलं आहे.

जेवणात फक्त एकच पोळी घेतली

वजन कमी करण्याचा निर्णय त्यांनी ६ महिन्यांपूर्वी घेतला होता. ज्यासाठी त्यांनी आपली प्रिय गोष्ट नॉनव्हेज खाणं सोडलं. वैद्यकीय गोष्टीमुळे त्यांना मासे खावे लागतात. पण जेवणात फक्त एकच पोळी त्यांनी घेतली. या डाएटमुळे त्यांचं वजन १४ किलोंनी कमी झालं आहे.

दरम्यान शरद पवार यांचं राजकारणात मोठं वजन असलं तरी त्यांनी आपलं शारीरिक वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि ते त्यांनी केलं देखील. त्यामुळे शरद पवार यांच्यासाठी अशक्य काहीच नसल्याचं पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं आहे.

COMMENTS