…त्यामुळेच शरद पवारांकडून अजित पवारांना बाजूला केलं जात आहे ?

…त्यामुळेच शरद पवारांकडून अजित पवारांना बाजूला केलं जात आहे ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अजित पवार यांना डावलून पक्षात खासदार सुप्रिया सुळे यांचे हात आणखी बळकट केले जात असल्याचे चित्र आहे. कारण सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षतेखाली सोशल मीडिया ते महिला सेल, राज्यस्तरीय डॉक्टर सेल आणि पार्टी फ्रंटलच्या बैठका घेतल्या जात आहेत. तर या बैठकांपासून अजित पवार मात्र दूर असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे राज्यात लक्ष घालत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या घटनांवरुन पवार कुटुंबात आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.टीव्ही नाईन मराठीने याबाबतची बातमी छापली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी
ईव्हीएमवरुन शरद पवार यांच्याविरोधात भूमिका मांडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी ईव्हीएमला कोणताही दोष दिला नाही, तर शरद पवारांनी पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं होतं. यामुळेच अजित पवारांना बाजूला केलं जात असल्याचं बोललं जातं आहे.

तसेच दोन दिवसांपूर्वी बारामतीच्या पाणीप्रश्नावरुन नशरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.त्यानेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघे निघून गेले. परंतु अजित पवार मात्र मागेच थांबले होते. त्यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबत नंतर अर्धा तास चर्चा केली होती. त्यामुळे सध्या राष्टेरवादीत सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

COMMENTS