पिंपरी चिंचवड – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठं अपयश आलं. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आक्रमक झाले असून त्यांनी विधानसभेसाठी नवी रणनीती आखायची ठरवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीआधी राष्ट्रवादीत मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी आमदार तसंच विधानसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार उपस्थित आहेत. बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलं यश मिळवता आलं नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनाच पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील या बैठकीत मावळमधील पराभवाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, अशी शरद पवार यांची भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
COMMENTS