साता-यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी शरद पवारांची मुंबईत बैठक!

साता-यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी शरद पवारांची मुंबईत बैठक!

मुंबई – साता-यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादाबाबत मुंबईत पक्ष कार्यालयात ही बैठक सुरु आहे. शरद पवारांच्या उपस्थिती सुरू असलेल्या बैठकीला स्वतः उदयनराजे भोसले आणि निंबाळकर यांच्यासह सातारमधील इतर पदाधिकारीही उपस्थित आहेत.

दरम्यान कालच विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांना इशारा दिला होता. खासदार उदयनराजेंना सांभाळायचे असेल त्यांना कंट्रोल करा नाहीतर आम्हाला बाहेर पडायची परवानगी द्या असं निंबाळकर यांनी म्हटलं होतं. यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासह निंबाळकर यांनी, खा.रणजित निंबाळकर आणि आ.जयकुमार गोरेंवरही जोरदार टीका केली होती. जिल्ह्यात जोपर्यंत तीन पिसाळलेली कुत्री आहेत तोपर्यंत माझी भूमिका सुध्दा पिसाळलेलीच असेल. तसेच शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे त्यात त्यांना सांगणार आहे तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत असा इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला होता. यानंतर याची दखल घेत शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे.

COMMENTS