पवार कुटुंबातील चार सदस्य लोकसभा निवडणुकीच्या मैदानात ?

पवार कुटुंबातील चार सदस्य लोकसभा निवडणुकीच्या मैदानात ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबातील चार सदस्य उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार हे स्वतः माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून मावळ मतदारसंघातून ते आपलं नशीब आजमावणार आहेत.

दरम्यान शरद पवारांनी 2009 साली सोलापुरातील माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्याआधी, जवळपास दोन दशकं राखलेली बारामतीची जागा त्यांनी लेकीसाठी सोडली होती. सुप्रिया सुळे सलग दुसऱ्यांदा बारामतीतून खासदार आहेत. त्यामुळे पवारांनी पुणे किंवा माढ्यातून निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे.

त्याचबरोबर गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेचं वर्चस्व असलेलल्या शिरुर मतदारसंघातून अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत. या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव-पाटील मोठ्या मताधिक्याने जिंकून येत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अजित पवारांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS