पुणे, जुन्नर – राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. जुन्नर येथून या यात्रेला सुरुवात झाली असून यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह इतरही नेते उपस्थित आहेत.आजपासून सुरू झालेल्या या शिवस्वराज्य यात्रेचा अमोल कोल्हे हे प्रमुख चेहरा असणार आहेत. शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होताच अमोल कोल्हे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आज, 'शिवस्वराज्य' यात्रेचा पहिला दिवस! अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील मातीनं भरलेला मंगल कलश हाती घेतला. नवस्वराज्य आणायचं, अशी शपथ घेत या महायात्रेला सुरुवात केली. pic.twitter.com/miMgJvcS6n
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 6, 2019
राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही छत्रपतींच्या मावळ्यांनी रयतेचा आवाज बुलंद करण्यासासाठी काढलेली यात्रा आहे. शिस्वराज्य यात्रेमुळे पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचाच असेल असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्रातील समस्यांची सोडवणूक करण्यात हे सरकार अपयशी ठरलं असून हे आम्ही या यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवणार असल्याचही कोल्हे यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS