मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज त्यांनी मंत्रालयात प्रवेश केला यावरुन नवाब मलिक यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. पंकजा मुंडे यांना दोन दिवसही सत्तेपासून दूर राहता येत नसल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान धनगरांना आरक्षण दिलं नाही तर २०१९ला सत्ता मिळणार नाही असे म्हटलं होतं असं स्पष्टीकरण मुंडे यांनी दिलं आहे. परंतु याचा अर्थ दोन दिवसपण सत्तेपासून दूर राहू शकत नाही. ही परिस्थिती आज आहे. यांचा हा खेळ सत्तेसाठीच असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
COMMENTS