राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्ता पॅनलची यादी जाहीर, आठ नवीन चेह-यांना संधी – जयंत पाटील

राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्ता पॅनलची यादी जाहीर, आठ नवीन चेह-यांना संधी – जयंत पाटील

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश प्रवक्ता पॅनलची यादी जाहीर आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. 31 जणांची ही यादी असून यामध्ये आठ नवीन चेह-यांना संधी दिली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. या यादीमध्य मुख्य प्रवक्तापदी नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली असून हेमंत टकले, वंदना चव्हाण, संजय खोडके यांची प्रवक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान मुंबई शहराच्या प्रवक्तेपदी विद्या चव्हाण, राहुल नार्वेकर, चित्रा वाघ, आदिती नलावडे, महेश चव्हाण, समीर दलवाई, क्लाईड क्रास्टी, तर पुणे जिल्ह्यात अंकूश काकडे, चेतन तुपे, जयदेव गायकवाड, विकास लवांडे, विजय कोलते, भूषण राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे

आनंद परांजपे, महेश तपासे,

औरंगाबाद

सुरजीतसिंग खुंगर, निलेश राऊत, उमर फारुकी,

अकोला

आशाताई मिरगे, नाशिक विश्वास ठाकूर, भारती पवार,

बीड

उषाताई दराडे, अमरसिंह पंडित

उस्मानाबाद

सक्षणा सलगर

सोलापूर

उमेश पाटील

नागपूर

प्रविण कुंटे पाटील

तर सूरज चव्हाण यांची समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांचे अभिनंद जयंत पाटील यांनी केले असून पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

COMMENTS