मुंबई – डान्सबारवरची बंदी उठवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी डील केलं होतं. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या डीलमध्ये मोठी आर्थिक देवाण घेवाण झाली असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे. बार मालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपच्या नेत्या शायना एन.सी. यांनी मध्यस्ती करुन ही डील केली होतं असा आरोपही मलिक यांनी केला आहे. आघाडी सरकार आलं तर राज्यात पुन्हा डान्सबार बंदी घालू असही मलिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्य सरकारने ठाम भूमिका मांडली नसल्यामुळेच डान्सबार सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच हा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे.
डान्स बार बंदीच्या विषयात राज्य सरकार पुन्हा एकदा न्यायालयात आपली बाजू मांडण्यास कमी पडले आहे. या निर्णयामुळे भविष्यात होणा-या परिणामांची चिंता वाटते. सरकारने डान्स बार पुन्हा सुरू होणार नाहीत यासाठी तातडीने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली पाहिजे. @CMOMaharashtra
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 17, 2019
COMMENTS