मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी आज भाजपच्या कार्यालयासमोर गाजर फेको आंदोलन केलं आहे. महागाई, पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे. गनिमी कावा पद्धतीने, पोलिसांना चकवा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन केलं आहे. सचिन अहीर, विद्या चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी येऊन हे आंदोलन केलं आहे. या कार्यकर्त्यांनी भाजप मुख्यालयाच्या दिशेने गाजरं फेकली आहेत. सर्व आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
पेट्रोल-डिझेलची दरवाढ, महागाई याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक…@MumbaiNCP चे अध्यक्ष @AhirsachinAhir यांच्या नेतृत्वात भाजप कार्यालयासमोर गाजरे दाखवत केले जोरदार आंदोलन..
आ. @vidyachavan12 , मुंबई महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, युवती अध्यक्ष @adi_nal इतर पदाधिकाऱ्यांचा सहभाग pic.twitter.com/l3nXPGaSwr— NCP (@NCPspeaks) October 16, 2018
दरम्यान वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, याविरोधात राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर तात्काळ कमी करण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत सरकारनं फक्त जनतेला आश्वासनांचं गाजर दिलं असून भाजप सरकारनं जेनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे.
COMMENTS