मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादीची ठाण्यात महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक, आनंद परांजपे आणि नवी मुंबई, मीरा भाईंदर शहर अध्यक्ष उपस्थित आहेत.
दरम्यान ठाण्यातून गणेश नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय समितीची बैठक उद्या मुंबईत पार पडणार असून यावेली सर्व मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. शरद पवार यांचे नाव माढा मतदारसंघातील उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS