ठाणे लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी पक्की !

ठाणे लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी पक्की !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झाली आहे. ठाणे लोकसभेसाठी
राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. याबाबतचे संकेत त्यांनी स्वतःच दिले आहेत. वयाची 69 वर्ष गाठली असून आजही मी ठाण्यापर्यंत जाऊ शकतो असं सूचक वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं आहे. त्यामुळे गणेश नाईकच ही निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान ठाण्यातून गणेश नाईक यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा खुद्द शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतही ठाण्यातून गणेश नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. परंतु नाईक यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती. त्यांनी अखेर याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ठाण्यातून गणेश नाईक यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे.

COMMENTS