मुंबई – एखाद्या गोष्टीची मागणी म्हणजे नाराजी नव्हे तर लाचारी सिद्ध होते अशा मथळ्याचं व्यगचित्र तयार करुन राष्ट्रवादीनं शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे व्यंगचित्र ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादीनं शिवसेना हा पक्ष सत्तेसाठी लाचार होता आणि आता मुख्यमंत्रीपदासाठीही लाचार झाला का? असा प्रश्न विचारला आहे. अमित शाह यांनी रविवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र शिवसेनेची ही नाराजी नाही तर लाचारी आहे अशी टीका व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
सत्तेसाठी लाचार.. आणि आता मुख्यमंत्रीपदासाठीही??@ShivSena @BJP4India @uddhavthackeray @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra pic.twitter.com/4aygwEZM4Q
— NCP (@NCPspeaks) June 11, 2019
दरम्यान या व्यंगचित्रात अमित शाह हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात धरून महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या दिशेने चालले आहेत. त्यांच्या हातात मुख्यमंत्रीपद असं लिहिलेला एक केक आहे. अमित शाह चालत असताना उद्धव ठाकरे हे त्यांचा सदरा धरून मागे फरफटत आहेत असे दाखवण्यात आले आहे. तसेच एखाद्या गोष्टीची मागणी म्हणजे नाराजी नव्हे तर लाचारी सिद्ध होते असा मथळाही या व्यंगचित्राला देण्यात आला आहे.
COMMENTS