या आठवड्यात राष्ट्रवादीला आणखी दोन मोठे धक्के बसणार!

या आठवड्यात राष्ट्रवादीला आणखी दोन मोठे धक्के बसणार!

मुंबई – विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील आणखी दोन नेते पक्ष सोडणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या आठवड्यात राष्ट्रवादीला आणखी दोन मोठे धक्के बसणार असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर भास्कर जाधव यांचा पक्षप्रवेश होणार आहे.  भास्कर जाधव यांच्यासोबत शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे.

दरम्यान नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचीही भाजप प्रवेश तारीख निश्चित झाली आहे. नाईक हे 11 सप्टेंबरला भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत.
तसेच यावेळी ठाणे- मुब्रा, पालघर, रायगडमधील राष्ट्रवादीचे आजी माजी अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 11 तारखेला वाशीमधील सीडको एक्झीब्युशन सेंटरमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नाईक यांच्या रुपानेआणखी एक धक्का बसणार आहे.

 

COMMENTS