विधानसभेसाठी राष्ट्रवादीतील ‘या’ सात नेत्यांची उमेदवारी पक्की, नव्या चेहय्रांना मिळणार संधी!

विधानसभेसाठी राष्ट्रवादीतील ‘या’ सात नेत्यांची उमेदवारी पक्की, नव्या चेहय्रांना मिळणार संधी!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांकडून उमेदवार ठरविले जात आहेत. काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी 10 तारखेला जाहीर होणार आहे. तर राष्ट्रवादीनंही आपले काही उमेदवार निश्चित केले असल्याची माहिती आहे. विधानसभेतील उमेदवारीसाठी पक्षातील काही दिग्गज नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत.तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, नवाब मलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काल पुण्यात पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती तसंच उमेदवारांच्या नावावरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत या सात नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रवादीची पहिली यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. या यादीत या सात नेत्यांसह इतरही काही नव्या चेहय्रांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS