अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या ‘या’ समर्थकानं दिला राजीनामा!

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या ‘या’ समर्थकानं दिला राजीनामा!

पिंपरी चिंचवड – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यानं राजीनामा दिला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या सूडाच्या राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत आहोत,’ असं जावेद शेख यांनी म्हटलं आहे. शेख यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल तडकाफडकी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.अजित पवार साताऱ्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. उदयनराजेंविरोधात सक्षम उमेदवार मिळत नसल्याने राष्ट्रवादीने अजित पवारांनाच त्यांच्या विरोधात उतरण्याची खेळी चालवली असल्याचं कळतंय. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

विधानसभेसोबत लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजीनामा देऊन अजित पवार सातारा लोकसभा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रीत करतील, असं बोललं जातंय. अजित पवार साताऱ्यातून लोकसभा लढल्यास बारामतीची जागा रिकामी होईल, त्याजागी त्यांचे पूत्र पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची राष्ट्रवादीची रणनीती असू शकते.
किंवा ईडीच्या कारवाईतून सहानुभूती मिळविण्यासाठीही त्यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS