नवी दिल्ली – दिल्लीतील झंडेवालन भागातील अनाज मंडीतील चार मजली इमारतीला आग लागली होती. धान्य बाजार येथे रविवारी पहाटे 5 वाजून 22 मिनिटांनी ही आग लागली होती. या भीषण आगीत 43 जणांना प्राण गमवावे लागले तर 14 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन पक्षातर्फे त्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
या अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शरद पवार यांच्या उपस्थितीत 10 लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे. शरद पवार यांनी व्यक्तीशः 5 लाख रुपयांचा धनादेश नातेवाईकांना दिला आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने जखमी व मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील मुलींना दत्तक घेतले आहे. तसेच, त्यांच्या शिक्षणाचा खर्चही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.जे. ज्योसमान हे यावेळी उपस्थित होते.
COMMENTS