नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. मोठा घटक पक्ष असलेला शिरोमणी अकाली दल एनडीए सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आज एनडीएनं आयोजित केलेल्या बैठकीला अकाली दलचे खासदार प्रेम सिंह चंदूमाजरा यांनी गैरहजेरी लावली आहे. त्यामुळे अकाली दल भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे.
दरम्यान खासदार प्रेम सिंह चंदूमाजरा यांनी आपण दुस-या महत्त्वाच्या बैठकीला जाणार होतो. त्यामुळे एनडीएच्या बैठकीला हजेरी लावता आली नसल्याचं म्हटलं आहे. तसेच आमच्यामध्ये कोणतेही मतभेत नसल्याचंही चंदूमाजरा यांनी म्हटलं आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच शिरोमणी अकाली दलाचे महासचिव मनजिंदर सिंह सिरसा यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली होती. भाजपनं गुरुद्वाराच्या मुद्द्यांध्ये ढवळाढवळ करु नये, अन्यथा वेळ पडली तर आम्ही एनडीएला सोडचिठ्ठी देखील देऊ शकतो असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे जुना सहयोगी पक्ष असलेला शिरोमणी अकाली दल एनडीए सोडण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS