तुम्हाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, तरीही राजकारणात यायचयं, मग ही बातमी नक्की वाचा !

तुम्हाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, तरीही राजकारणात यायचयं, मग ही बातमी नक्की वाचा !

बुलडाणा – कार्यकर्ते हवे आहेत अशी जाहिरात एका दैनिकात आली आहे. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष सुभाष राजपूत यांनी ही जाहिरात एका दैनिकात दिली आहे. राजकारणात चांगल्या व्यक्ती याव्यात, भ्रष्ट राजकारण्यांना चाप बसावा यासाठी ही जाहिरात दिली आहे अशी माहिती सुभाष राजपूत यांनी दिली आहे. या जाहिरातीला तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

कोणाला प्रवेश दिला जाईल ?

ज्यांना समाजसेवेची आवड आहे. समाजात काही सकारात्मक बदल घडवायचे आहेत. वंचितांना न्याय मिळवून द्यायचा आहे. अशांना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. अन्यायाविरोधात लढण्याची तयारी असणारे, सामाजिक बांधिलकी असलले कार्यकर्ते हवे आहेत असंही जाहिरातीमध्ये सांगण्यात आलंय. हा नवा प्रकार नक्कीच कौतुकास्पद आहे. बघूया यातून राजकारणात कसा बदल होतो ते.

COMMENTS