नवीन आमदार निवासात आमदारांना मिळणार भव्य फ्लॅट!

नवीन आमदार निवासात आमदारांना मिळणार भव्य फ्लॅट!

मुंबई- मनोरा आमदार निवासाची इमारत धोकादायक झाली असल्याने मागील कित्येक महिन्यापासून इमारत पाडण्याच्या बातम्या होत्या. परंतु आता मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकास होणार असल्याच कळतंय. मनोराची इमारत पाडून त्याजागी दोन भव्य अशे टॉवर उभे राहणार आहेत.
50 मजली आणि 35 मजली अशे दोन टॉवर मध्ये आमदारांना एक हजार चोरस फुटाचे फ्लॅट उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या टॉवरचे काम 2021 पर्यंत पूर्ण होईल.

मनोरा आमदार निवास नविन आमदार निवास म्हणून परिचित आहे 1994 मध्ये बांधलेली ही इमारत 25 वर्षातच धोकादायक झाली. आमदारांच्या खोल्यात स्लॅबचे तुकडे पडू लागले असून यातून एक कार्यकर्ता बचावला ही होता. याचाच धागा पकडत अजित पवार यांनी तो स्लॅब चा तुकडा विधानसभेत नेहून मनोरा आमदार निवास कश्याप्रकरे धोकादायक झाला आहे हे दाखवून दिलं होतं. त्यानंतर ही इमारत पाडण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला होता.

COMMENTS