नवी दिल्ली – पत्रकार परिषदेदरम्यान भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला बूट फेकून मारल्याची घटना घडली आहे.
दिल्लीमध्ये भाजप कार्यालयात भाजपचे ज्येष्ठ नेते जीवीएल नरसिम्हा राव यांच्यावर एका डॉक्टरने बूट फेकून मारला आहे. भाजप नेते भूपेन्द्र यादव आणि जीव्हीएल नरसिम्हा राव एक पत्रकार परिषद घेत होते त्यावेळी डॉक्टर शक्ती भार्गव याने त्यांच्यावर बूट फेकून मारला. त्यानंतर या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान शक्ती भार्गव हा कानपूरचा रहिवाशी असुन तो पेशाने डॉक्टर आहे. डॉक्टरी बंद करुन तो बिल्डर झाला असल्याची माहिती आहे. तसेच मला बूट लागलेला नसून या प्रकरणाची माहिती घेतली जाणार असल्याचं जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी म्हटलं आहे.
COMMENTS