नवी दिल्ली – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप मुख्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव, उपस्थित आहेत. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसात पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर या तिन्ही राज्यातील निवडणूक प्रभारींसोबत अमित शाह चर्चा करणार आहेत.
दरम्यान ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार आहे. गेल्या वेळी 18 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. त्यामुळे यावेळेसही सप्टेंबरमध्येच विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील अशी शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर शाह यांनी आज बैठक बोलावली आहे.
COMMENTS