काँग्रेसची बैठक संपली, विधानसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय!

काँग्रेसची बैठक संपली, विधानसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा मोठा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. याबाबत वंचित बहूजन आघाडीशी लवकरच चर्चा केली जाणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे. ३ जुलै रोजी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत आंबेडकरांसोबत आल्यानंतर जागांची चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणूक लढण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जागावाटपाबाबतची लवकर चर्चाकरण्यात येणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडोट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच आजच्या बैठकीत सर्व नेत्यांनी राहुल गांधींना राजीनामा वापस घेण्याची विनंतीही केली आहे.

COMMENTS