नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी आज मतदान पार पडलं. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दिल्लीत ५७.०६ टक्के एवढं मतदान झालं आहे. राजधानी दिल्लीत बोचरी थंडी असल्याने देखील त्याचा फरक मतदानावर पडल्याचं दिसून आलं आहे. ११ फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे ११ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
दिल्लीत अनेक जागांवर दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने आहेत. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा आपणच सत्तेत येऊ असा विश्वास आहे. तर भाजप आणि काँग्रेसलाही आपण बाजी मारणार असल्याचं वाटत आहे.दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात भाजपने मुख्यमंत्री केजरीवाल आणि त्यांच्या आप पक्षावर बरीच टीका केली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रमुख लढत ही आप आणि भाजपमध्येच पहायला मिळाली आहे.
दरम्यान अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाल्यानंतर आता आणखी एक राज्य भाजपच्या हातून निसटणार की भाजप आपलं कमळ राजधानी दिल्लीत फुलवण्यात यशस्वी होणार, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एक्झिट पोलमतदानानंतर विविध वाहिन्यांचे आणि वृत्तसंस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत.
सर्वच एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार दिल्लीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचं सरकार येणार असल्याचं दिसत आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये ‘आप’ला बहुमत मिळताना दाखवले आहे. भाजपला मोठा फटका बसणार असून त्यांना अपेक्षित जागाही मिळताना दिसत नाहीत. तसेच काँग्रसेचं दिल्लीत पुन्हा पानीपत होताना या एक्झिट पोलमधून दिसत आहे.
टाइम्स नाऊच्या सर्व्हेनुसार आपला ४७ तर भाजप आघाडीला केवळ २३ जागा मिळताना दिसत आहेत.
एबीपी सीव्होटर्सएबीपी सीव्होटर्सच्या सर्व्हेनुसार आपला ५६, भाजप आघाडीला १२ आणि काँग्रेस आघाडीला केवळ दोन जागा मिळणार असल्याचं दिसून येत आहे.
जन की बातजन की बातच्या सर्व्हेत आपला ५५ आणि भाजप आघाडीला केवळ १५ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
न्यूज एक्स नेतान्यूज एक्स नेतानेही आपला ५५ जागा दिल्या असून भाजप आघाडीला १४ जागा दिल्या आहेत. तर काँग्रेसल अवघ्या एका जागेवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
इंडिया न्यूज नेशनइंडिया न्यूज नेशन सर्व्हेनेही आपला ५५ जागा दिल्या असून भाजप आघाडीला १४ जागा दिल्या आहेत. तर काँग्रेसल अवघ्या एका जागेवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
न्यूज एक्स-पोलस्टारन्यूज एक्स-पोलस्टारच्या सर्व्हेत आपला ५६ जागा आणि भाजपला १४ जागा दाखविल्या आहेत.
सुदर्शन न्यूजसुदर्शन न्यूजने आपला ४२, भाजप आघाडीला २६ आणि काँग्रेसला दोन जागा दाखविल्या असून इंडिया टीव्हीने आपला ४४ आणि भाजप आघाडीला २६ जागा दाखविल्या आहेत.
COMMENTS