नवी दिल्ली – शिवसेना खासदारांनी आज लोकसभेत गदारोळ केला आहे. यावेळी या खासदारांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत घोषणाबाजी केली आहे. तसेच या खासदारांनी ओला दुष्काळासंदर्भात स्थगन प्रस्ताव टाकला आहे. महाराष्ट्रात राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. केंद्राने अतिरिक्त मदत जाहीर करावी आणि महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी, अशा मागण्या करत शिवसेना खासदारांनी आज संसदेबाहेर सरकारविरोधात निदर्शने केली आहेत.
दरम्यान संसदेबाहेर आक्रमक झालेली शिवसेना संसदेत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. अखेर शिवसेना खासदारांनी लोकसभेतही गदारोळ घातला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील तणाव आता वाढला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS