कोल्हापूर – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. विरोधकांनी भाजपविरोधात महाआघाडीची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे. अशातच महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एका नव्या पक्षानं एन्ट्री मारली आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या मराठा क्रांती मोर्चानंतर स्थापन झालेल्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत एन्ट्री मारण्याची घोषणा केली आहे. हा पक्ष उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभा मतदारसंघ वगळता महाराष्ट्रातील 47 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच यापैकी राज्यातील आपल्या 14 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पक्षाचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत दिली आहे.
COMMENTS