मुंबई – पंतप्रधानपदासाठी सध्या एका नावावर जोरदार ट्वीटर ट्रेंड सुरु झाला आहे. विशेष म्हणजे या नावाचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्यामुळे अनेक जण आश्चर्यचकीत होत आहे. ते नाव म्हणजे 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक जिंकून देणारा भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविडचं. होय राहुल द्रविडचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढं करण्यात येत आहे. ट्विटरवर यासंदर्भात ट्रेंड सुरु झाला असल्याचं पहावयास मिळत आहे.
दरम्यान, संगीतकार विशाल ददलानी यांनी यासंदर्भात पहिलं ट्विट केलं आहे.यामध्ये ददलानी यांनी राहुल द्रविडला पंतप्रधान करण्याचं आवाहन केलं आहे.
Can we please just elect Dravid to the post of PM?
I know it sounds silly, but this is the kind of person India needs. Someone who cares for others. Everything else can be learnt, but decency & kindness come from within.
https://t.co/UjshjFTJFR— VISHAL DADLANI (@VishalDadlani) February 25, 2018
दरम्यान 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने खेळाडूंसह सपोर्टिंग स्टाफला बक्षिसांची घोषणा केली होती. परंतु सर्वांची मेहनत समान असल्यामुळे सर्वांना समान बक्षिस देण्याची मागणी राहुल द्रविडनं केली होती. त्यानंतर द्रविडची ही मागणी बीसीसीआयलाही मान्य करावी लागली. त्यानंतर ददलानी यांनी हे ट्वीट केलं असून ददलानींच्या ट्वीटनंतर #RahulDravidForPM असा ट्रेंड सुरु झाला आहे.
https://twitter.com/oldmonkwalking/status/968081153566564353
COMMENTS