नवी दिल्ली – मनमाड-इंदूरसह राज्यातील दोन मार्गांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मनमाड-इंदूरसह राज्यातील कल्याण-कसारा तिस-या रेल्वेमार्गाला आणि ब-याच दिवसांपासून मागणी होत असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच या रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचंही गडकरींनी म्हटलं आहे.
दरम्यान मनमाड ते इंदूर या प्रकल्पाचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागू शकतो. परंतु तो तीन ते चार वर्षात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचंही यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच 362 किलोटीमटरच्या या रेल्वेमार्गासाठी 8 हजार 574 कोटींचा खर्च येणार असून महाराष्ट्रातले 186 किमी आणि मध्य प्रदेशमध्ये 176 किमी असं एकूण 362 किमी अंतर पार करता येणार आहे.
COMMENTS