परप्रांतातून येणा-या दुधावर कर लावा, निलम गो-हेंची विधानपरिषदेत मागणी !

परप्रांतातून येणा-या दुधावर कर लावा, निलम गो-हेंची विधानपरिषदेत मागणी !

नागपूर – परप्रांतातून येणा-या दुधावर कर लावण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्या आमदार निलम गो-हे यांनी आज विधानपरिषदेत केली आहे. दुध उत्पादकांच्या आंदोलनाबाबत ९७ अन्वये चर्चेत बोलतांना दूध उत्पादकांना थेट ५ रु लिटरला द्यावेत या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचंही गो-हे यांनी म्हटलं आहे. १९६५ ला प्रतिदिन १ लाख लिटरची उलाढाल होती, आता ती २१ कोटी लिट दुधा पर्यंत पोहचली आहे. दूध उत्पादन कल्याणकारी संघ, अहमदनगर – वडगाव आमली ता पारनेर जि. नगर यांच्यावतीने गुलाबराव डेरे यांनी मला निवेदन दिले आहे, त्यातून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या बऱ्याच प्रश्नावर प्रकाश पडत असल्याचंही गो-हे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यानन ४० टक्के वाटा सहकार पक्षाचा, ६० टक्के खाजगी क्षेत्राचा वाटा आहे. दुधाचे ब्रँड कमी करून एक ब्रँड शासन, सहकाराचा व दुसरा खाजगी ब्रँड ठेवावा जेणेकरुन ग्राहकांची व शेतकऱ्यांची लूट थांबेल. गावोगावची दुधसंकलन केंद्रे बंद पडली आहेत. गावागावात खाजगी संख्या दुधाचा दर्जा सांभाळतातच असे नाही त्याचसोबत दुधभेसळ प्रतिबंधक उपाय गरजेचे आहेत. परराज्यातील दुधावर कर लावण्यात यावा व त्याचवेळी टोन्ड दूध बंद करून गायीचे दूध हा खास ब्रँड प्रोत्साहित करावा अशी मागणीही गो-हे यांनी केली आहे.

दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, आज दै सामनाने अग्रलेखात शेतकरी दूध उत्पादकांची व्यथा समजून घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. जे सरकार बुलेटट्रेनसाठी हजारो कोटी रुपये जाहीर करते त्याच सरकारला शेतकऱ्यांचे प्रतिलीटर ५ रुपय का जड वाटावेत? शेतकरी कष्ट करतात पण त्यांच्या घरातील महिला शक्ती अहोरात्र राबत असते. आज त्यांच्या कष्टाचे किमान वेतन मोजले तर दुधाच्या उत्पादनाचा खर्च कितीतरी पटीने अधिक गृहीत धरावा लागेल. स्त्रियांच्या कष्टाचे मोल मोजून ही प्रतिलीटर ५ रु थेट मदत तुटपुंजी आहे. सरकारने दुधसंघांना सक्षम करायचा प्रयत्न करावा व शेतकऱ्यांना सक्षम होतील असे धोरण राबवावे असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS