मुंबई – या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये चुरशीची लढाई पहायला मिळाली आहे. काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे तर शिवसेनकडून विद्यमान खासदार विनायक राऊत निवडणूक रिंगणात होते.ही लोकसभा निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला होता. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याबाबतचं चित्र 23 तारखेला स्पष्ट होणार आहे.
दरम्यान या निवडणुकीपूर्वी विविध माध्यमांनी
एक्झिट पोल माडले आहेत. ‘न्यूज18’च्या एक्झिट पोलनुसार निलेश राणे यांना पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. याठिकाणी शिवसेनेचे विनायक राऊत विजयी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.न्यूज18’च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळणार?
भाजप – 21 ते 23
शिवसेना – 20 ते 22
काँग्रेस – 0 ते 1
राष्ट्रवादी – 3 ते 5
एकूण : 48
महायुती – 42 ते 45
महाआघाडी – 4 ते 6
COMMENTS