मुंबई – डोईजड होत असल्यामुळे राष्ट्रवादीकडूनच धनंजय मुंडे यांच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याची टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. धनंजय मुंडेंना बाद करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची खेळी सुरु झाली आहे. मुंडेंच्या प्रसिध्दीचा फटका अजित पवारांना पडतोय आणी आपल्याला कोणी मागे टाकत असेल तर हे पवार कुटुंबाला सहन होत नाही अशी टीका निलेश यांनी ट्वीटरवर केली आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
कालच्या प्रकरणा मुळे धनंजय मुंडेनां बाद करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची खेळी सुरु झाली आहे. मुंडेंच्या प्रसिध्दीचा फटका अजित पवारांना पडतोय आणी आपल्या कोण माघे टाकतोय हे पवार कुटुंबाला सहन होत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 2, 2018
दरम्यान विधान परिषदेत प्रश्न दडपण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पैसे घेतल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच कथित ऑडिओ क्लीपमुळे भाजप आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. ऑडिओ टेप म्हणजे पुरावा असून विधिमंडळाच्या सदस्यावर दलालीचे आरोप होत असतील तर या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली. परंतु हे सर्व आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले असून आपल्याविरोधात षडयंत्र रचलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परंतु निलेश राणे यांनी हे राष्ट्रवादीचंच षडयंत्र असून डोईजड होत असल्यामुळेच धनंजय मुंडे यांच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS