कोकणात करपलेल्या भाकरी परतायची वेळ आली आहे –  निलेश राणे

कोकणात करपलेल्या भाकरी परतायची वेळ आली आहे – निलेश राणे

रत्नागिरी – माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. कोकणात विकास झालेला नाही, येथील खासदारांना विकासाची, येथील समस्यांची माहिती नाही. तेव्हा करपलेली भाकरी परतायची वेळ आली आहे, २०१९ च्या निवडणुकीत संधी द्या,  जिल्ह्याचं कोकणाचं चित्र बदलून टाकू असं आवाहन निलेश राणे यांनी केलं आहे. मांजरे येथील ग्रामस्थांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान या परिसरातील विविध विकासकामांसाठी खासदार नारायण राणेंच्या फंडातून निधी मिळाला. रत्नागिरीने अवघ्या महाराष्ट्राला नीलेश राणेंची ओळख दिली. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी पुढे झालो आहे. कोकणावर सेनेचे विशेष लक्ष आहे, असे सांगितले जाते पण गेल्या पाच वर्षांत खासदारांनी रत्नागिरीसाठी काय दिले ते माहित नाही. नवीन काय ते दिसत नाही. खासदार सभागृहातच नव्हे, तर मतदारसंघात दिसत नसल्याची टीका यावेळी निलेश राणे यांनी केली आहे.

COMMENTS