मुंबई – केरळमधे निपाह (Nipah) व्हायरसनं धुमाकूळ घातला असून या व्हायरसमुळे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केरळमध्ये सध्या दहशतीचं वातावरण असून महाराष्ट्रातही या व्हायरसबाबत खबरदारी घेतली जात आहे. निपाह विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात दक्षता घेण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं तातडीची बैठक घेतली आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या उपस्थितीत आरोग्य संचालक, सचिव, आरोग्य सेवा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्रालयात बैठक घेतली आहे. राज्यात निपाह विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीच्या उपाय योजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच याबाबत उद्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हारॉलॉजी (NIV) आणि संसर्गजन्य समितीची बैठक घेण्यात येणार आहे. निपाह याला NiV इन्फेक्शन असंही म्हणतात.
निपाहची लक्षणे
श्वास घेण्यास त्रास
प्रचंड ताप
डोकेदुखी
छातीत जळजळ
चक्कर येणं
बेशुद्ध पडणं
उपाय
या व्हायरसवर अद्याप एकही लस तयार करण्यात आलेली नाही.
केवळ इंटेन्सिव्ह सपोर्ट केअर (ICU) देऊनच इलाज करता येतो.
लागण झाल्यापासून 48 तासांत उपचार न मिळाल्यास रुग्ण कोमात जातो. नंतर मृत्यू…
कशामुळे लागण होते?
फ्रुट बँट जातीच्या वटवाघळांमुळे
आणि डुकरांमुळे याची लागण होते. लागण झालेल्या व्यक्तीशी सपर्क आल्यासही लागण होते.
काय काळजी घ्याल?
झाडांवरुन जमिनीवर पडलेल फळं खाऊ नका.
पक्षांनी खाल्लेली फळं खाऊ नका.
घराजवळ डुकरांचा वावर होऊ देऊ नका.
COMMENTS