मुंबई – मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. निरुपम हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली असून पक्षातील विरोधकांना संदेश देणाचा प्रयत्न निरुपम यांनी केला असल्याचं बोललं जात आहे. निरुपम यांना मुंबई अध्यक्ष पदावरून हटवून मिलिंद देवरा यांना अध्यक्ष करण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे देवरा आणि कामत गटाने तक्रार केली होती. त्यानंतर निरुपम यांनी आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे धाव घेतली आहे.
Met Hon.Congress President @RahulGandhi ji today and briefed him about party activities in Mumbai.#JaiHo pic.twitter.com/PPFUHFNhDt
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) October 8, 2018
दरम्यान संजय निरुपम यांच्या उत्तर भारतीयांच्या वक्तव्याबाबत काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अप्रत्यक्ष नापसंती दाखवली आहे. मिलिंद देवरा यांनी ट्विट करून आपली भावना व्यक्त केली असून मुंबईवर सर्वांचा समान हक्क आहे, कोण कोणत्या राज्यातील आहे, कुठल्या जातीचा, धर्माचा आहे अथवा कोणती भाषा बोलतो ते महत्त्वाचे नाही. काँग्रेस याच मूल्यांवर विश्वास ठेवते. अशी भूमिका ट्विटद्वारे मिलिंद देवरा यांनी मांडली आहे. या ट्विटमध्ये नाव घेता देवरा यांनी निरुपम यांना काँग्रेस मूल्यांची आठवण करून दिली आहे.
COMMENTS