मुंबई – मी केलेलं आंदोलन कुणाला आवडो किंवा न आवडो बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांना हे आंदोलन नक्कीच आवडलं असतं असतं त्यांनी माझं कौतुक केलं असतं. शाब्बास नितेश तू केलंस ते चांगलं केलंस असं ते म्हटले असते. असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. उप अभियंत्याच्या अंगावर बादली भरून चिखल ओतल्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना अटक करण्यात आली होती. काल त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.या सुटकेनंतर बोलत असताना त्यांनी बाळासाहेबांची आठवण काढली.
दरम्यान नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना चिखलफेक प्रकरणात ४ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयाने त्यांना ९ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. जामिनावर सुटल्यानंतर नितेश राणे यांनी स्वतःच्या भूमिकेचं समर्थन करत बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मला या आंदोलनाबद्दल शाबसकीच दिली असती असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपली भूमिका फेसबुक लाइव्ह करून मांडणार असल्याचं ट्विट त्यांनी केले आहे.
I shall be soon doing a Facebook live on the the entire incident n also abt my experiences during my arrest as the truth should come out for people to judge my actions !
Will keep u all posted!— nitesh rane (@NiteshNRane) July 10, 2019
COMMENTS