कोल्हापूर – नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राजेयातील लोकसभेच्या पाच जागा लढवणार आहे. याबाबतची माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे. नितेश राणे यांनी आज कोल्हापूरचा दौरा केला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या पाच पैकी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून माजी खासदार निलेश राणे यांची पक्षामार्फत उमेदवारी यापुर्वीच जाहीर झाली आहे. तसेच एक जागा मुंबईतील तर एक जागा ठाण्याची असणार असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान आमचा मुख्य विरोधक हा शिवसेनाच असणार असून तसेच शक्य असेल तिथे भाजपशीही आम्ही लढू असही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. चौकीदार चोर है’ पासून “मोदी मुर्दाबाद’ चा नारा दिलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सत्तेसाठी लाचार झाले, स्वार्थासाठीच त्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती केल्याने स्वतःची विश्वासार्हताही त्यांनी गमावली आहे. यापुढे महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नसल्याची टीकाही आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
COMMENTS