सिंधुदुर्ग – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांची भेट घेतली आहे. राणे यांच्या घरी जाऊन पवारांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. परंतु या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका असं पवारांनी 20 मिनिटांच्या भेटीनंतर म्हटलं आहे.
दरम्यान शरद पवार आणि नारायण राणे यांच्या भेटीनंतर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. या भेटीनंतर नारायण राणे हे संपले नाहीत हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. राणे काय आहेत हे शरद पवारांना माहित असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राणे यांचं राजकीय वर्तुळात अजूनही पहिल्यासारखंच वजन असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
आज कोकण दौऱ्यादरम्यान #कणकवली येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष श्री. @MeNarayanRane यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध मुद्द्यांवर राणे यांच्याशी मनमोकळी चर्चा करता आली. pic.twitter.com/7at1kr7FzR
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 3, 2018
काँग्रेस सोडल्यानंतर नारायण राणे यांची राजकीय कारकिर्द संपली असल्याची टीका विरोधकांनी केली होती. तसेच राणे हे विलिनवासात असल्याचंही अनेक वेळा विरोधकांनी म्हटलं होतं. पवार भेटीनंतर नितेश राणे यांनी मात्र विरोधकांना प्रत्युत्तर दिलं असून राणे संपले नाहीत हे विरोधकांनी लक्षात घ्यावं असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितेश राणे बोलत होते.
COMMENTS