मुंबई – कोकणची वाट लावण्याची सुपारी शिवसेनेनं घेतली असल्याची जोरदार टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नाणार प्रकल्पाबाबत विधानसभेत शिवसेनेनं जे लेखी उत्तर दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांचा खोटारडेपणा या लेखी उत्तराने समोर आला असल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे. नाणार विरोधात कोणतंही आंदोलन झालं नसल्याचं लेखी उत्तर सुभाष देसाई यांनी विधानसभेत दिलं आहे त्यावेर ते बोलत होते.
दरम्यान शिवसेनेनं दिलेल्या या उत्तरावर राष्ट्रवादीचे आमदार भाष्करराव जाधव यांनीही टीका केली असून नाणार प्रकल्पाबाबत विचारलेल्या प्रश्नांची धादांत खोटी उत्तरं लिखित स्वरूपात दिली असल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच ते सरकारी उत्तर वेगळं आणि प्रत्यक्षात तोंडावर वेगळं सांगतायत, यावरुन शिवसेना लोकांची शुद्ध फसवणूक करत आहे. उद्धव ठाकरे लोकांचा विरोध असल्यास प्रकल्प होणार नाही असे सांगतात तर त्यांचे उद्योग मंत्री लेखी उत्तरात खोटं बोलतात, यामुळे सेनेचा दुटप्पीपणा पुन्हा चव्हाट्यावर आला असल्याचंही भाष्करराव जाधव यांनी म्हटलं आहे.
COMMENTS