मुंबई – मुंबईतील ‘मराठी’चा टक्का घसरत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईत झपाट्याने होत असलेल्या व्यावसायिक बदलांमुळे तसंच नोकरीसाठी स्थलांतरित झालेल्या इतर भाषिक लोकांमुळे मराठी मुंबईचा हळूहळू हिंदी भाषिकांचे शहर बनण्याच्या दिशेने प्रवास सुरु असल्याचं दिसत आहे.
मातृभाषेसंदर्भातल्या २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार, मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या २००१ साली २५.८८ लाख होती. २०११ मध्ये हेच प्रमाण ३५.९८ लाख इतके झाले आहे. तर दुसरीकडे त्याचवेळी मराठी मातृभाषिकांच्या संख्येत २.६४ टक्क्यांनी घट झाली असून २००१ साली ४५.२३ लाख लोकांनी त्यांची मातृभाषा मराठी असल्याचे सांगितले होते. मात्र, १० वर्षांनी म्हणजेच २०११ साली हे प्रमाण ४४.०४ लाख एवढे झाले आहे.
यावरुन आमदार नितेश राणे यांने शिवसेनेला टोला लगावला आहे. नितेश राणे यांनी ट्वीट करत शिवसेनेचे अभिनंदन मुंबईमध्ये मराठी टक्का कमी.. करून दाखवले असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे अभिनंदन
मुंबई मध्ये मराठी टक्का कमी..
करून दाखवले !!— nitesh rane (@NiteshNRane) February 11, 2019
COMMENTS